भडगावच्या ‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात संतापाची लाट, सर्वपक्षीय संघटनांकडून बंदची हाक
VIDEO | भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, भडगावमध्ये कुणी दिली बंदची हाक?
जळगाव, ५ ऑगस्ट २०२३ | जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हाधराला आहे. भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. इतकेच नाहीतर तिचा मृतदेह चाऱ्याच्या कुट्टीत लपवल्याचा प्रकार उघड झाला आहे. या संतापजनक घटनेविषयी संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनांकडून भडगाव बंदची हाक देण्यात आली आहे. या पिडीत चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी भडगाव बंदची हाक देण्यात आली आहे. ही बंदची हाक दिल्यानंतर भडगाव बंदला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकऱणी फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे.