कोल्हापुरात शाळेच्या बसवर दगडफेक, दसरा चौकात अज्ञातांकडून हल्ला
कोल्हापुरातील दसरा चौक या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर ही दगडफेक करण्यात आली आहे. अज्ञातांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर, ३१ जानेवारी, २०२४ : कोल्हापुरात काही अज्ञात व्यक्तींकडून शालेय विद्यार्थ्यांच्या बसवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील दसरा चौक या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर ही दगडफेक करण्यात आली आहे. अज्ञातांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक आणि पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था कोल्हापुरातील दसरा चौकच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेली आहे. याच ठिकाणी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका शाळेच्या बसवर काही अज्ञातांकडून ही दगडफेक केली आहे. दरम्यान, या तोडफोडीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे पोलीसांकडून या घटनेचा कसून तपास सुरू आहे.