अशी यात्रा कधी पाहिलीये? जिथं देव-दानवांच्या युद्धाचा रंगतो थरार
देव दानवांचं युद्धाची दोन दिवसीय यात्रा उत्सव पुण्याच्या खेड तालुक्यातील कोयाळी गावात रंगलीय. खेड तालुक्यातील कोयाळी गावातील भानोबा देवाची यात्रेत देवदानवांच्या युद्धाचा थरार पहायला मिळतो. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले हजारो भाविक या यात्रेत सहभागी झालेत
पुणे, १४ डिसेंबर २०२३ : देव दानवांचं युद्धाची दोन दिवसीय यात्रा उत्सव पुण्याच्या खेड तालुक्यातील कोयाळी गावात रंगलीय. खेड तालुक्यातील कोयाळी गावातील भानोबा देवाची यात्रेत देवदानवांच्या युद्धाचा थरार पहायला मिळतो. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले हजारो भाविक या यात्रेत सहभागी झालेत. भानोबाचा मुखवटा हातात घेऊन हा उत्सव सुरु होतो. मार्गशीर्ष प्रतिपदेला भानोबा जन्मस्थान मंदीरापासून मिरवणूक निघते. मंदिरातील समोरच्या पटांगणात दानव हातात काठ्या घेऊन जमलेले असतात. यावेळी एक विडा दिला जातो. हा विडा स्विकारताच पुढे असलेल्या तरुणाच्या अंगात युद्धाचा अविष्कार संचारतो आणि हे दानव धडाधडा कोसळतात. शेकडो तरुण खाली पडले असल्याचे चित्र दिसत आहे. तर ही अंधश्रद्धा नाही तर भाविकांची भानोबावर असणारी श्रद्धा असल्याचे सांंगितले जाते.
Published on: Dec 14, 2023 10:32 PM
Latest Videos