अभिनेते शरद पोंक्षे, आदेश बांदेकर यांच्यामध्ये खडाजंगी
अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्यामध्ये सोमवारपासून सोशल मीडियावर खडाजंगी पाहायला मिळत आहे. बांदेकरांनी शरद पोंक्षेंचा एक मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करत ‘हा शरद पोंक्षे तूच ना?’, असा सवाल केला.
अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्यामध्ये सोमवारपासून सोशल मीडियावर खडाजंगी पाहायला मिळत आहे. बांदेकरांनी शरद पोंक्षेंचा एक मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करत ‘हा शरद पोंक्षे तूच ना?’, असा सवाल केला. कॅन्सरशी लढा देत असताना एकनाथ शिंदेंनी केलेल्या मदतीबद्दल सांगत पोंक्षेंनी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला होता. त्यावरून बांदेकरांनी टोला पोंक्षेंना टोला लगावला. यावर नंतर पोंक्षेंनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे बांदेकरांना उत्तर दिलं. आपल्या पुस्तकातील फोटो पोस्ट करत ‘शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही’, असं त्यांनी म्हटलंय. शरद पोंक्षेंनी कॅन्सरवर मात करण्याच्या प्रवासावर ‘दुसरं वादळ’ हे पुस्तक प्रकाशित केलंय.