‘अन्नाची शपथ घेऊन गद्दारी करणारे दुसऱ्यांना सल्ले देतायंत’, आदित्य ठाकरे यांचा रोख कुणावर?
VIDEO | 'अन्नाची शपथ घेऊन गद्दारी करणारे दुसऱ्यांना सल्ले देतायंत', ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांची शिंदे सरकारमधील 'त्या' मंत्र्यावर सडकून टीका म्हणाले, 'अन्नाची शपथ घेऊन गद्दारी करणारे...'
मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ | केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केली आहे. केंद्राच्या कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्यात संताप झाल्याचे पाहायला मिळत आहे तर यानिर्णयाविरोधात कांदा उत्पादक अग्रेसर असलेला नाशिक जिल्हा येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच शिंदे सरकारमधील नेत्यानं काल अजबच वक्तव्य केल्याचे समोर आले. परवडत नसेल तर कांदा खाऊ नका, असे वक्तव्य दादा भुसे यांनी केले. इतकेच नाही तर दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडतं? असा सवालही दादा भुसे यांनी उपस्थित केला. यावर ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक होत आपली प्रतिक्रिया यावर दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘अन्नाची शपथ घेऊन गद्दारी करणारे दुसऱ्यांना सल्ला देतायत, की तुम्ही कांदा खाऊच नका. असे वक्तव्य करणारे मंत्री महाराष्ट्राने बघितले हेच आमचे दुर्दैव आहे.’