सोलापूर-पु्णे महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, टँकरची समोरासमोर धडक; पाच जण ठार

सोलापूर-पु्णे महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, टँकरची समोरासमोर धडक; पाच जण ठार

| Updated on: Nov 28, 2021 | 11:04 AM

सोलापूर- पुणे महामार्गावर टँकर आणि ट्रकचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भिमानगर येथे घडला .

पुणे: सोलापूर- पुणे महामार्गावर  टँकर आणि ट्रकचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भिमानगर येथे घडला . भीमा नदी पुलावर रोडचे काम चालू आहे. रोडचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात  आले आहे.