Savita Malpekar On Ketaki Chitale | जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकरांची केतकी चितळेवर घणाघाती टिका
"कोण आहे ही केतकी, काय लायकी आहे तिची? तिचं कर्तृत्व काय आहे? एखाद-दुसऱ्या सीरिअलमध्ये काम केलंय. ज्या सीरिअलमध्ये तिला स्वत:चं कामसुद्धा टिकवतं आलं नाही, त्या मुलीने असं काहीतरी बोलावं," अशा शब्दांत अभिनेत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीस सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी राग व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला रविवारी ठाणे न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुंबईतही तिच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले. केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. तिच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टीकेची झोड सुरू केली. त्यानंतर आता कलाविश्वातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “कोण आहे ही केतकी, काय लायकी आहे तिची? तिचं कर्तृत्व काय आहे? एखाद-दुसऱ्या सीरिअलमध्ये काम केलंय. ज्या सीरिअलमध्ये तिला स्वत:चं कामसुद्धा टिकवता आलं नाही, त्या मुलीने असं काहीतरी बोलावं,” अशा शब्दांत अभिनेत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या सरचिटणीस सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी राग व्यक्त केला आहे.