गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला विश्वास आहे की…
राज्य सरकारकडून 13 ऑक्टोबर रोजी क्युरेटिव्ह पिटीशन दाखल कऱण्यात आले होते. दरम्यान, यावर आज दुपारी सुनावणी होणार असून कोर्टाकडून कोणतं निरीक्षण नोंदवलं जाणार याकडे लक्ष लागले आहे. अशातच गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षणावर भाष्य केले आहे.
मुंबई, ६ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणाबाबत आज क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुप्रीम कोर्टात सर्वोच्च सुनावणी होणार आहे. राज्य सरकारकडून 13 ऑक्टोबर रोजी क्युरेटिव्ह पिटीशन दाखल कऱण्यात आले होते. दरम्यान, यावर आज दुपारी सुनावणी होणार असून कोर्टाकडून कोणतं निरीक्षण नोंदवलं जाणार याकडे लक्ष लागले आहे. अशातच गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, संविधानावर माझा विश्वास आहे. खुल्या वर्गातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारातून सांगण्यात आलेले आहे की, 50 टक्के जागा या गुणवंतांसाठी ब्राह्मण, वैश्य, जैन आणि बौद्ध असतील जर कोणी गुणवंत असतील त्या सगळ्या गुणवंतांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं कवच आहे. तर सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च या देशाच्या जे पुस्तक आहे. भारतीय संविधान त्या संविधानाच्या पुस्तकानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला 50 टक्के कवच निश्चित संरक्षण होईल, यांच्या मला खात्री आहे. डंके की चोट पर मला विश्वास आहे की 50 टक्क्यांच्या वर आरक्षण जाणार नाही, असा विश्वासही गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला.