संजय राऊत यांनी अजित पवार यांचं केलं तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘दादा म्हणजे कमाल की चीज अन्…’
VIDEO | नारायण राणे यांना बाईनं पाडलं ! अजित पवार यांच्या टोलेबाजीवर संजय राऊत म्हणतात, नेता असाच असतो...; काय म्हणाले राऊत?
मुंबई : अजित पावर यांचा नारायण राणे यांच्यावरील टीकेचा बाईट ट्वीट करत संजय राऊत यांनी त्यांच्यावर टोला लगावला आहे. यावेळी संजय राऊत यांनी अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक केले आहे. राऊत यांनी पहिल्यांदाच ट्विट करून अजित पवार यांची स्तुती केली आहे. अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आपल्या अनोख्या शैलीत टीका केली. त्यामुळे राऊत यांनी अजित पवार यांचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांची स्तुती केली आहे. दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज… असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश!, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी अजित पवार यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. बघा काय म्हणाले होते भाषणात अजित पवार…
Published on: Feb 24, 2023 01:41 PM
Latest Videos