असं Grand Welcome पाहिलंय का? रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत
जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. आज त्यांनी या रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 'माझी तब्येत ठणठणीत आहे पण आता मी माझ्या गावी जात असलो तरी मी माझ्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही', असे स्पष्टपणे म्हटले आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं
छत्रपती संभाजीनगर, १२ नोव्हेंबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरमधील एका रूग्णालयात मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. आज त्यांनी या रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले, आपण तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे सांगितले आहे. तर यावेळी दिवाळी साजरी करणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासह ज्या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली, माझ्या बांधवांच्या घरात अंधार पसरलेला असताना मी माझ्या घरात दिवाळी कशी साजरी करू? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. माझी तब्येत ठणठणीत आहे पण आता मी माझ्या गावी जात असलो तरी मी माझ्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.