कोल्हापूरच्या रंकाळा तलावाकाठी मृत माशांचा खच, काय आहे कारण?

कोल्हापूरच्या रंकाळा तलावाकाठी मृत माशांचा खच, काय आहे कारण?

| Updated on: May 29, 2023 | 12:52 PM

VIDEO | कोल्हापूरच्या रंकाळा तलाव प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर, तलावाकाठी मृत माशांचा खच

कोल्हापूर : कोल्हापुरात पंचगंगा नदी नंतर आता रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचा देखील प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रदूषित पाण्यामुळे रंकाळा तलावातील शेकडो मासे मृत झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तलावाकाठी मृत माशांचा खच पाहायला मिळतोय. गेल्या तीन ते चार दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जातंय. या प्रकारामुळे आता परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे. विशेष म्हणजे हे मृत मासे तलाव बाहेर काढण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सकाळपासून काम करत आहेत मात्र त्यांना सुरक्षेची साधने देखील पुरवली नसल्याचं दिसून आलंय. रंकाळा तलाव परिसरात वाढलेल्या नागरी वस्तीचे सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळत आहे. त्यामुळेच या प्रदूषणात वाढ झाल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचा म्हणणं आहे. रंकाळा तलावाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या प्रशासनाने आधी या तलावाचे संवर्धन करावं अशी मागणी देखील केली जात आहे.

Published on: May 29, 2023 12:52 PM