राज्यात अवकाळीचा फटका, नाशिकनंतर मुख्यमंत्री उद्या करणार ‘या’ जिल्ह्याची पाहणी
VIDEO | नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर
मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री आमदार आणि इतर पदाधिकारी हे आयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी गेले होते. तो दौरा पूर्ण करून महाराष्ट्रात परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट नाशिक दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले आणि मुख्य सचिवांसह राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर पंचनामे करून त्याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्यात. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री धारूरवाडी आणि बामणी या ठिकाणची पाहणी उद्या करणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ७१ गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याचे समोर आले आहे.
Published on: Apr 10, 2023 07:05 PM
Latest Videos