टपरीचालकाला शिवीगाळ, श्रीपाद छिंदम विरोधात नगरमध्ये पुन्हा गुन्हा
टपरी चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमसह 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
एका टपरी चालकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छिंदमसह 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुद्ध अपशब्द काढून छिंदम चर्चेत आला होता
Latest Videos