नणंद-भावजयनंतर आता बारामतीत दोन्ही पवार जावा आमने-सामने

नणंद-भावजयनंतर आता बारामतीत दोन्ही पवार जावा आमने-सामने

| Updated on: Mar 27, 2024 | 10:50 AM

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संभाव्य उमेदवार आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार.. अजित पवार यांच्या भूमिकेविरोधात आधी श्रीनिवास पवार यांनी टीका केली. त्यानंतर शर्मिला पवार यांनी विरोध करत रामायण आणि महाभारताचं उदाहरण दिलंय

बारामतीच्या लढाईत आता महाभारताच्या वादाची एन्ट्री झाली आहे. कृष्णाविरोधात भावकी एकवटली होती असे म्हणत सुनेत्रा पवारांनी अजित पवारांविरोधात गेलेल्या नातलगांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय. बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजाय लढाईत दोन जावा-जावांमध्ये सामना रंगलाय. यामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संभाव्य उमेदवार आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार.. अजित पवार यांच्या भूमिकेविरोधात आधी श्रीनिवास पवार यांनी टीका केली. त्यानंतर शर्मिला पवार यांनी विरोध करत रामायण आणि महाभारताचं उदाहरण दिलंय. यावरून सुनेत्रा पवार यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलय. ‘श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच..’, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सुनेत्रा पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय म्हटलंय सुनेत्रा पवार यांनी …

Published on: Mar 27, 2024 10:50 AM