अजित पवार विधानसभेला 60 जागांवर राजी? दादा कार्यकर्त्यांना म्हणाले, कामाला लगा…
अजित पवारांनी 60 जागांचा उल्लेख केला. तर भाजपचे नेते भागवत कराडांनी भाजपही 111-112 जागांवर तयारी असल्याचं म्हटलंय. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. भाजपनं मिशन 125साठी 150 जागा लढवाव्यात असं ठरवल्याची माहिती आहे. त्यामुळं 138जागा शिल्लक राहतात..या 138 मधून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळतील. जागा वाटपात भाजप,शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच होणार आहे.
जागा वाटपावरुन अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय. 60 जागांवर कामाला लागा, असं अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणालेत. याआधी अजित पवारांनी 90 जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं, आता त्यामुळं आता दादा 60 जागांवर राजी झालेत का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कारण अजित पवारांनी उघडपणे 60 जागांचं गणित मांडून, कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्यात. 2019 च्या निकालानुसार राष्ट्रवादीचे 54, 3 अपक्षासह काँग्रेसचे हिरामण खोसकर, झिशान सिद्धीकी आणि सुलभा खोडके आपल्यासोबतच आहेत, असं अजित पवार म्हणालेत. मात्र आता चर्चा अशी आहे, 90 जागांवरुन दादा 60 जागांवर आलेत का? दरम्यान, महायुतीत सहभागी होताच, अजित पवारांनी 90 जागा लढणार असल्याचं म्हटलं होतं. पण आता अजित पवारांनी 60 जागांचा उल्लेख केल्यानं, विजय वडेट्टीवारांनी खिल्ली उडवलीय. 60 वरुन आता 40 वरही येतील, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत, 27 पैकी 19 मतदारसंघ असे आहेत. जिथं भाजपच्या उमेदवारांना पराभूत करुन राष्ट्रवादीनं विजय मिळवला. आणि हे 19 आमदार सध्या अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळं या 19 जागा पूर्णच्या पूर्ण दादांच्या राष्ट्रवादीला सोडणार का? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट