CM Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’ना द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नाही? अजित पवार स्पष्टच म्हणाले….
दैनिक टाईम्स ऑफ इंडियानं अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेबद्दल चिंता व्यक्त करत वर्षाला ४६ हजार कोटींचं खर्च होणार असून सध्याचं कर्ज आणि घोषित योजनेसाठी निधी आणायचा कुठून? अशी चिंता वित्त विभागाकडून वर्तवण्यात आली होती. यावर अजित पवार म्हणाले...
लाडक्या बहीण योजनेसाठी सरकार सक्षम असून वित्त विभागाने सरकारच्या तिजोरीत पैसे नाही अशी चिंता वर्तवल्याची बातमी खोटी असल्याचा दावा अजित पवार यांनीच केला. माध्यमांनी वस्तूस्थिती न तपासता कोणत्याही ऐकीव बातम्या न देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलंय. काल दैनिक टाईम्स ऑफ इंडियानं अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेबद्दल चिंता व्यक्त करत वर्षाला ४६ हजार कोटींचं खर्च होणार असून सध्याचं कर्ज आणि घोषित योजनेसाठी निधी आणायचा कुठून? अशी चिंता वित्त विभागाकडून वर्तवण्यात आली होती. यावर अजित पवार म्हणाले, माध्यमांनी बिनबुडाच्या बातम्या देऊ नये, महिलांचं स्वावलंबन आणि विकासासाठी लाडकी बहीण योजना राबवण्याची सरकारची तयारी असून महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला रक्कम करणं शक्य आहे, असं अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Published on: Jul 28, 2024 11:05 AM
Latest Videos