अजित पवार म्हणतात, आम्ही म्हणतो तेच खरं...आता फक्त माझं ऐका; बारामतीकर कुणाचं ऐकणार?

अजित पवार म्हणतात, आम्ही म्हणतो तेच खरं…आता फक्त माझं ऐका; बारामतीकर कुणाचं ऐकणार?

| Updated on: Dec 25, 2023 | 11:08 AM

थेट आणि स्पष्ट बोलणाऱ्या अजित पवार यांनी आम्ही बोलतोय तीच राष्ट्रवादी असं म्हटलंय. दरम्यान ३८ व्या वर्षी भूमिका घेत शरद पवार यांनी सरकार बनवलं. तर मी वयाच्या ६० व्या वर्षी भूमिका घेत असेल तर चूक काय? अजित पवार यांचा थेट सवाल

मुंबई, २५ डिसेंबर २०२३ : बारामतीच्या अंगणात पॉवरगेमची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. बारामतीकरांनी फक्त माझं ऐकावं असं आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केलंय. त्याचबरोबर शरद पवार यांच्या १९६७ च्या बंडाचा दाखला देत अजित पवार यांनी स्वतःच्या भूमिकेला योग्य ठरवलंय. तर यामुळे अजित पवार पुन्हा एकदा फार्मात आल्याचं बोललं जात आहे. कारण थेट आणि स्पष्ट बोलणाऱ्या अजित पवार यांनी आम्ही बोलतोय तीच राष्ट्रवादी असं म्हटलंय. दरम्यान ३८ व्या वर्षी भूमिका घेत शरद पवार यांनी सरकार बनवलं. तर मी वयाच्या ६० व्या वर्षी भूमिका घेत असेल तर चूक काय? असं म्हणत अजितदादांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना बाजूला केलं गेलं असं म्हणत शरद पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलंय. बघा स्पेशल रिपोर्ट काय म्हणाले अजित पवार..?

Published on: Dec 25, 2023 11:06 AM