Ajit Pawar मुख्यमंत्री होणार? रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुरज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
VIDEO | अजित पवार मुख्यमंत्री होणार? अजित पवार यांच्या गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विधानावर सुरज चव्हाण यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले बघा?
मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३ | आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्याक काल एक सूचक वक्तव्य केले होते. यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार हे सहभागी झाल्यानंतर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. साताऱ्यातील दहिवडी येथे अजित पवार गटाचा एका बैठकीत आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी सूचक विधान केलंय. महाराष्ट्राचा भविष्यातील विकास सुरक्षित ठेवण्यासाठी हा कटू निर्णय आम्हाला घ्यावा लागला. यासाठी विचार केला तर अजित पवार यांच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरा माणूस दिसत नाही. एकविसाव्या शतकात प्रमुख राज्य म्हणून विकसित करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ज्याप्रमाणे 1999 मध्ये शरद पवार यांना पंतप्रधान बनवण्याचे आम्ही स्वप्न पाहिले त्या पद्धतीने आम्ही अजित दादांच्या बाबत मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहतोय त्यांना योग्य वेळी मुख्यमंत्री बनवणार असे विधान काल त्यांनी केलं. या विधानावर अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले सुरज चव्हाण पहा व्हिडीओ…