Ambadas Danve : ‘रायगडचं पालकमंत्रिपद भरत गोगावलेंना मिळणार नाही’; ठाकरेंच्या बड्या नेत्यानं थेट कारणच सांगितलं
गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच रायगड दौऱ्यावर शाह येऊन गेल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची शक्यता होती मात्र यावेळी कोणतीच यावर चर्चा झाली नसल्याचे समोर आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी अर्जंट बोलावून घेतल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात ठाकरे गट शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना सवाल केला असता त्यांनी यावर थेट भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांना बोलवलं असेल तर याला फार महत्त्व देऊ नये. जर गोगावले यांना एकनाथ शिंदे यांनी बोलवलं असेल तर त्यांच्या पालकमंत्रिपदासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलवलं असावं, अशी शक्यता अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. ‘रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद भरत गोगावले यांना मुळीच मिळणार नाही’, असं स्पष्ट अंबादास दानवे म्हणाले. यासह दानवे असेही म्हणाले, एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये मोजत नसल्याने रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद भरत गोगावले यांना मिळणार नाही असं वाटतंय. खाते वाटप, बदल्यावरून, आर्थिक अधिकारावरून सगळेच शिंदेंचे निर्णय देवेंद्र फडणवीस घेतांना दिसताय. एकनाथ शिंदे काहीच करू शकणार नाही, असं म्हणत अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

