Amchya Pappani Ganpati Anala गाण्याच्या रीलचा धुमाकूळ, मात्र गायक प्रसिद्धीपासून दूर; कुणी गायलं गाणं? 

Amchya Pappani Ganpati Anala गाण्याच्या रीलचा धुमाकूळ, मात्र गायक प्रसिद्धीपासून दूर; कुणी गायलं गाणं? 

| Updated on: Sep 12, 2023 | 6:41 PM

VIDEO | Amchya Pappani Ganpati Anala गाण्याच्या रीलचा सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ, मात्र या गाण्याचे गीतकार अन् गायक प्रसिद्धीपासून दूर, कोण आहेत या गाण्याचे मूळ गायक आणि गीतकार ?

ठाणे, १२ सप्टेंबर २०२३ | सध्या कोणत्याही गोष्टीला प्रसिद्धी मिळण्यासाठी समाज माध्यमांवर ती प्रकाशित होणे गरजेचे झालेला आहे आणि अशातच सध्या गणपतीच्या मुहूर्तावर आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्याचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. त्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे हा मुलगा प्रत्येकांच्या घरोघरी पोहोचला. इतकंच नव्हे तर हे गाणं सर्व अबालवृद्धांच्या तोंडी रेंगाळू लागलं. पण या गाण्याचे गीतकार आणि चिमुकले गायक कधीच समाजासमोर आलेच नाहीत आणि ते प्रसिद्धीपासून दूर राहिल्याचे म्हटले जात आहे. मात्र भिवंडीतील अंजूर फाटा येथे राहणाऱ्या मनोज घोरपडे हे या गाण्याचे गीतकार असून त्याचा चिमुकला मुलगा मोहित उर्फ माऊली व मुलगी शौर्य हे दोघं या गाण्याचे गायक आहेत. मागील चार वर्षांपूर्वी त्याने आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे लिहिले होते. हे गाणं लहान मुलांच्या आवाजात चांगलं वाटेल म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही मुलां कडूनच सराव करून घेत हे गाणं 2022 मध्ये गाऊन घेतलं होतं, बघा काय म्हणाले घोरपडे

Published on: Sep 12, 2023 06:41 PM