Worli Koliwada येथे होळीचा उत्साह, Amit Thackeray यांच्या हस्ते होलिकादहन

Worli Koliwada येथे होळीचा उत्साह, Amit Thackeray यांच्या हस्ते होलिकादहन

| Updated on: Mar 17, 2022 | 9:18 AM

राज्यात आज होळीचा सण (Holi festival) साजरा होतोय. राज्यभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातोय. यावेळी राजकीय नेते मंडळी देखील या उत्सवात भाग घेत आहेत.

मुंबई : राज्यात आज होळीचा सण (Holi festival) साजरा होतोय. राज्यभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातोय. यावेळी राजकीय नेते मंडळी देखील या उत्सवात भाग घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी देखील होळी उत्सवात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thacekray) यांच्या वरळी (Varali) मतदारसंघात अमित ठाकरेंनी हजेरी लावल्यानं महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election) पार्श्वभूमीवर तर ही हजेरी नाही ना, अशीही चर्चा सध्या रंगली आहे. मध्यरात्री वरळी कोळीवाड्यात खास होळीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते होलीका दहन करण्यात आलं. होळीनिमित्त कोळी बांधव आणि भगिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. या उत्साहाच्या वातावरणात आणि अमित ठाकरेंच्या उपस्थितीत होळी सण साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिकांची आणि कोळी बांधावांची गर्दी दिसून आली.

हजेरी अन् चर्चेला उधान
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी वरळीत होळीनिमित्त हजेरी लावली आहे. मात्र, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्च्या रंगल्या आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अमित ठाकरेंची हजेरी कशी, यामागे महापालिकेचे गणित तर नाही ना, अशाही चर्चा सध्या केंद्रस्थानी आहेत. आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंच्या वरळीमधील होळीनिमित्त लावले्या हजेरीला त्या दृष्टीकोणातून जाणकार पाहतायेत. अमित ठाकरेंची वरळीमधील उपस्थिती आणि होळी सणातील सहभाग हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचं बोललं जातंय. कारण, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मतदारांशी संवाद साधायला सुरु केलंय. या न त्या कारणांना राजकीय नेते मंडळी आपापल्या मतदारसंघात मतदारांशी संवाद साधताना दिसून येतायेत.