Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजपासून 'या' शहरात हेल्मेटसक्ती, नियमांचं पालन न केल्यास इतक्या रूपयांचा दंड

आजपासून ‘या’ शहरात हेल्मेटसक्ती, नियमांचं पालन न केल्यास इतक्या रूपयांचा दंड

| Updated on: May 23, 2023 | 8:29 AM

VIDEO | दुचाकीस्वारासह मागे बसणाऱ्यांना हेल्मेट बंधनकारक, हेल्मेट नसल्यास भरावा लागणार इतक्या रूपयांचा दंड

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका आणि सर्व शासकीय आस्थापना तसेच खाजगी आस्थापना यांनी त्यांच्या आस्थापनेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना तसेच कार्यालयात येणाऱ्या सर्व दुचाकी चालक व मागे बसून येणाऱ्या व्यक्तीस हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी आस्थापनेतील अधिकारी व कर्मचारी तसेच वरील आस्थापनेत येणाऱ्या सर्व दुचाकीस्वारांना हा नियम लागू असणार आहे. जिल्ह्यातील होणाऱ्या अपघातात, मोटार सायकलचे अपघात व त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहेत. मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र मोटार वाहन नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 सह 194 (ड) नुसार दुचाकी वाहन चालक व त्याच्यामागे बसून प्रवास करणाऱ्या चार वर्षावरील सर्व व्यक्तीस भारत मानक संस्थेने ठरवून दिलेल्या प्रमाणकानुसार हेल्मेट वापरणं बंधनकारक असणार आहे. पण हेल्मेट न घातल्यास 1000 रूपयांचा दंड भरावा लागणार आहे.

Published on: May 23, 2023 08:29 AM