आझाद मैदानाबाहेर अंगणवाडी सेविका आक्रमक, रस्त्यावर उतरून धरणं आंदोलन अन् घोषणाबाजी
सरकारने पेन्शन लागू करावं, वेतनश्रेणीत अंगणवाडी सेविकांना घ्यावं, अशी अंगणवाडी सेविकांची प्रमुख मागणी आहे. तर सरकारने आमच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात राज्यभरातून तळागाळातून या अंगणवाडी सेविका आपल्या मागणीसाठी आझाद मैदानात पोहोचल्या आहेत.
मुंबई, ३ जानेवारी २०२४ : मुंबईच्या आझाद मैदानाबाहेर गेटवर अंगणवाडी सेविका एकवटल्या असून त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका या मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाल्यात. सरकारने पेन्शन लागू करावं, वेतनश्रेणीत अंगणवाडी सेविकांना घ्यावं, अशी अंगणवाडी सेविकांची प्रमुख मागणी आहे. तर सरकारने आमच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात राज्यभरातून तळागाळातून या अंगणवाडी सेविका आपल्या मागणीसाठी आझाद मैदानात पोहोचल्या आहेत. त्यामुळे सरकारने दखल घ्यावी अन्यथा आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम राहू आंदोलन करतच राहू अशी संतप्त प्रतिक्रियाही अंगणवाडी सेविकांनी दिली. यावेळी आक्रमक होत अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली तर मुंबई पालिकेसमोरचा रस्ता सेविकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर हजर झाले आहेत. ते त्यांच्याशी काय संवाद साधणार याकडे लक्ष लागले आहे.