नवी मुंबईच्या APMC मध्ये मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा, मार्केटमध्ये शुकशुकाट
मराठा समाजाच्या आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह अंतरवाली सराटी ते थेट मुंबईत.. मुंबईच्या अगोदर नवी मुंबई एपीएमसी धान्य मार्केट या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे विराट सभा घेणार आहे. त्यासाठी एपीएमसी मार्केट आज आणि उद्या बंद ठेवण्यात आलेलं आहे.
नवी मुंबई, २५ जानेवारी २०२४ : मराठा समाजाच्या आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी हजारो मराठ्यांसह अंतरवाली सराटी ते थेट मुंबई या ठिकाणी पदयात्रा काढली आहे. मुंबईच्या अगोदर नवी मुंबई एपीएमसी धान्य मार्केट या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे विराट सभा घेणार आहे. त्यासाठी एपीएमसी मार्केट आज आणि उद्या बंद ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवत नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची देखील सोय मोर्चेकरांसाठी करण्यात आलेले आहे. मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी येणार आहे .त्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबई पोलीस बंदोबस्त आणि एपीएमसी या ठिकाणचे सुरक्षा रक्षक मंडळ तैनात असणार आहे. तर या विराट सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं असताना मनोज जरांगे पाटील हे आपला विराट मोर्चा मुंबईकडे वळवणार की या ठिकाणीच थांबवणार हे देखील पहाणे गरजेचे राहणार आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

