म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांनी आपला हक्क बजावत केलं मतदरांना आवाहन

म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांनी आपला हक्क बजावत केलं मतदरांना आवाहन

| Updated on: Apr 19, 2024 | 3:15 PM

चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत तर त्यांचा सामना भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी रंगताना दिसणार आहे. वर्धा वेली या मतदारसंघातून मतदान करण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांकडून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आलं आहे.

चंद्रपूरच्या वर्धा वेली मतदारसंघातील स्त्री, पुरूष आणि दिव्यांग मतदारांसह तृतीयपंथी मतदारांना देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार आहेत तर त्यांचा सामना भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी रंगताना दिसणार आहे. वर्धा वेली या मतदारसंघातून मतदान करण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांकडून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आलं. तर आम्ही तृतीयपंथी असलो तरी काय झालं, आमच्या मतालाही तितकंच महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरच्या वर्धा वेली लोकसभा मतदार संघात 20 तृतीयपंथी मतदार आहेत. त्यांनी आज आपला मतदानाचा हक्क बाजवला आहे. दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भामधील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यासाठी सर्व चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भागात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची अतिरिक्त कुमक बंदोबस्त ठेवत आहे.

Published on: Apr 19, 2024 03:15 PM