Ambedkar Jayanti 2023 : एक रुपयांच्या नाण्यावर साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कोण आहे ‘तो’ अवलिया
VIDEO | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एक रुपयांच्या नाण्यावर बाबासाहेब आंबेडकर यांची कलाकृती साकारून केले अनोखं अभिवादन, बघा व्हिडीओ
मुंबई : राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अशातच एका कलाकाराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. एक रुपयांच्या नाण्यावर विरारच्या चित्रकार कौशिक जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साकारले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक रुपयाच्या नाण्यावर बाबासाहेबांची कलाकृती साकारून हे अनोखं अभिवादन या अवलियाने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजन अँड इट्स सोल्युशन (मराठी रुपयाची समस्या ) हा त्यांचा शोध प्रबंध होता. इ. स.1990 मध्ये भारत सरकारने आंबेडकरांची 100 वी जयंती साजरी करताना त्यांच्या स्मरणार्थ ₹1 चे नाणे काढले होते म्हणून चित्रकार कौशिक जाधव यांनी एक रुपयाच्या नाण्यावर डॉ.बाबासाहेबांचे चित्र कलाकृतीतून रेखाटून त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. हे चित्र रेखाटण्याकारीता वॉटर कलर्सचा वापर करून अवघ्या 30 मिनिटांच्या कालावधीत बारकाईने हे चित्र तयार केले. चित्रकार कौशिक जाधव हा विरार येथील रहिवासी असून वसईतील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत कला शिक्षक आहे.