Asha Workers Protest | आशा वर्कर्स आजपासून संपावर, योग्य मानधन देण्याची मागणी
राज्यभरात 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तक आहेत. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे. (Asha Workers Protest)
वारंवार गाऱ्हाणे मांडून देखील सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करुनही त्यांचे मानधन कमी देत आहे. त्यामुळे जर आशा कर्माचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर आमचा संप अटळ आहे, असा थेट इशारा आशा वर्करनेचे कृती समिती अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी दिला आहे. राज्यभरात 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तक आहेत. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संप करा, आमचे आम्ही बघून घेऊ असे सांगितले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आशा कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करतात पण देत काहीच नाही, अशी व्यथाही एम. ए. पाटील यांनी मांडली. (ASHA workers across Maharashtra on strike today)
Latest Videos