आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्पाच्या भूमिपुजनाचा एखादा फोटो दाखवावा; शेलारांचं खुलं आव्हान

आदित्य ठाकरेंनी वेदांता प्रकल्पाच्या भूमिपुजनाचा एखादा फोटो दाखवावा; शेलारांचं खुलं आव्हान

| Updated on: Sep 16, 2022 | 3:25 PM

हा प्रकल्प तुम्ही आणला असेल, हा दावा आदित्य ठाकरेंचा असेल तर त्याचं भूमिपूजन का केलं नाही? या प्रकल्पाबाबत काळंबेरं काय झालं? त्याचं उत्तर शिवसेनेने द्यावं; असं आव्हानाच शेलर यांनी केलं.

मुंबई: वेदांता प्रकल्प (vedanta project) महाराष्ट्रात आला कधी होता? महाराष्ट्रात या प्रकल्पाला सवलती दिल्याची आधीच्या सरकारने कागदपत्रे दाखवावीत. या प्रकल्पासाठी जागा घेतल्याचा पुरावा दाखवावा. भूमिपूजन झालं, पायाभरणी झाली याचा फोटो दाखवावा. त्याचा करारनामाही झाला नाही. कोणताही गोष्ट झाली नाही. ज्याचा करारनामा झाला नाही, ज्या प्रकल्पाची सवलत संमती झाली नाही, त्याची पायाभरणी झाली नाही, तो प्रकल्प गेला, पळाला, हा शिवसेनेचा जावईशोधच नाही का? असा सवाल भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार (ashish shelar) यांनी केला आहे. हा प्रकल्प तुम्ही आणला असेल, हा दावा आदित्य ठाकरेंचा (aaditya thackeray) असेल तर त्याचं भूमिपूजन का केलं नाही? या प्रकल्पाबाबत काळंबेरं काय झालं? त्याचं उत्तर शिवसेनेने द्यावं; असं आव्हानाच शेलर यांनी केलं.

Published on: Sep 16, 2022 03:24 PM