पगार देण्यासाठी महिला मुख्याधिकाऱ्याचा लेखापालावर कार्यालयात वस्तू फेकून हल्ला

पगार देण्यासाठी महिला मुख्याधिकाऱ्याचा लेखापालावर कार्यालयात वस्तू फेकून हल्ला

| Updated on: Jan 13, 2022 | 12:27 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती नगर पंचायतीच्या महिला मुख्याधिका-याचा आक्रस्ताळेपणा वायरल झाला आहे.  नियमबाह्य देयकांचे धनादेश काढून न दिल्याने लेखापालावर कार्यालयातच हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती नगर पंचायतीच्या महिला मुख्याधिका-याचा आक्रस्ताळेपणा वायरल झाला आहे.  नियमबाह्य देयकांचे धनादेश काढून न दिल्याने लेखापालावर कार्यालयातच हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लेखापाल सागर कु-हाडे यांना थेट कक्षात जाऊन जाब विचारत टेबलवरील वस्तू फेकून मारल्या. इतर कर्मचारी समजावत असताना मुख्याधिकारी कविता गायकवाड यांनी पुन्हा-पुन्हा टेबलाजवळ येत केला हल्ला. वायरल व्हिडीओत गायकवाड आपला 3 महिन्याचा पगार लेखापालाने काढला नसल्याने रागात असल्याचे संभाषणातून होत आहे स्पष्ट.