Aurangabad | एकाच बेडवर 2-2 मुलांवर उपचार, औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात चिमुकल्यांची गर्दी
रुग्णालयातील तुफान गर्दीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एका बेडवर दोन दोन मुलं झोपल्याचं दिसत आहे. तर बेडच्या खाली मुलांचे पालक, कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही गर्दी पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी लहान मुलांची तुफान गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गर्दी इतकी वाढली आहे की एकाच बेडवर दोन दोन मुलांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. घाटी रुग्णालयात रुग्णांची अक्षरशः तोबा गर्दी झाली आहे. या रुग्णालयातील तुफान गर्दीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एका बेडवर दोन दोन मुलं झोपल्याचं दिसत आहे. तर बेडच्या खाली मुलांचे पालक, कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही गर्दी पाहायला मिळत आहे. वातावरण बदलामुळे औरंगाबादेत 80 टक्के मुलं आजारी पडल्याची माहिती आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या लेकरांसह औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी धाव गर्दी केल्याचं दिसत आहे.
Latest Videos