दक्षिण अफ्रिकेतून आलेला विद्यार्थी निगेटिव्ह

दक्षिण अफ्रिकेतून आलेला विद्यार्थी निगेटिव्ह

| Updated on: Dec 03, 2021 | 11:45 AM

दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू सर्वप्रथम आढळून आल्याने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आफ्रिकेतून (African Countries) औरंगाबादेत आलेल्या विद्यार्थ्याबाबत साशंकता निर्माण झाली होती.

औरंगाबादः संपूर्ण जगाने धसका घेतलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Verient) आपल्या भागात शिरकाव होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीसह देशभरातील यंत्रणा खबरदारी घेत आहे. दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू सर्वप्रथम आढळून आल्याने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आफ्रिकेतून (African Countries) औरंगाबादेत आलेल्या विद्यार्थ्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे मुंबई आणि औरंगाबाद (Aurangabad Airport) विमानतळावर त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. तेथे निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याला दोन्ही ठिकाणहून सोडून देण्यात आले होते. तोपर्यंत त्याला क्वारंटाइन करण्यात आले नव्हते.