Aurangabad | औरंगाबादच्या ओझर गावात गावगुंडांकडून मेंढपाळांना बेदम मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

Aurangabad | औरंगाबादच्या ओझर गावात गावगुंडांकडून मेंढपाळांना बेदम मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

| Updated on: Jul 15, 2021 | 10:49 AM

औरंगाबाद जिल्ह्यातील ओझर गावातील गावगुंडांनी मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळांना बेदम मारहाण केलीय. मारहाणीत चार ते पाच मेंढपाळ गंभीर जखमी झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील ओझर गावातील गावगुंडांनी मेंढ्या चारणाऱ्या मेंढपाळांना बेदम मारहाण केलीय. मारहाणीत चार ते पाच मेंढपाळ गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील खिर्डी गावातील मेंढपाळांना ही मारहाण झालीय. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोदावरी नदीच्या परिसरात मेंढपाळ मेंढ्या चारत होते. त्यावेळी तिथे जवळपास 10 ते 15 गावगुंड हातात लाठ्या-काठ्या घेऊन आले. त्यांनी थेट मेंढपाळांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात चार-पाच मेंढपाळ जबर जखमी झाले आहेत. मारहाण करणाऱ्या तरुणांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पण अजूनही मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही.

 

Published on: Jul 15, 2021 10:48 AM