Ayodhya Ram Mandir : महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट, अयोध्येतील श्रीरामांच्या पूजेसाठी धुळे जिल्ह्यात कुणाला मान?
रामलल्लाच्या भव्य मंदिराचं उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सोहळ्यासाठी समस्त हिंदू उत्सुक असून या दिवसाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच राम मंदिराच्या पूजेसंदर्भातील एक मोठा मान महाराष्ट्राला देण्यात आला आहे
अयोध्या, ५ जानेवारी २०२४ : अयोध्येत बहुप्रतिक्षित अशा रामलल्लाचं भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण येत्या २२ जानेवारी रोजी होणार आहे. रामलल्लाच्या भव्य मंदिराचं उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सोहळ्यासाठी समस्त हिंदू उत्सुक असून या दिवसाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच राम मंदिराच्या पूजेसंदर्भातील एक मोठा मान महाराष्ट्राला देण्यात आला आहे. अयोध्येतील श्रीरामांच्या पूजेच्या साहित्याचं मान महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याला मिळाला आहे. येत्या २२ तारखेच्या होम हवन पुजेच्या साहित्याचा मान महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील केले परिवाराला मिळाला आहे. या पूजेचं सगळं साहित्य चंद्रकांत केले परिवाराने राम मंदिरासाठी दिले आहे. राम मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपतराय हे पूजन केलं आहे. तर २०० कलशाने रामाला अंघोळ घातली जाणार असून सोने ,चांदी आणि ताम्र या कलशात वापरण्यात आलं आहे. होम हवानासाठी लागणारे लाकूड सगळं पूजेचं साहित्य महाराष्ट्रातून आणण्यात आलं आहे.