Ayodhya Ram Mandir : नशीबच भारी… महाराष्ट्रातील ‘या’ दाम्पत्याला रामलल्लाच्या पूजेचा मान, मोदींसोबत बसणार पूजेला
पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असलेल्या रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पुजेला देशातील ११ दाम्पत्य पूजा करणार आहेत. या ११ दाम्पत्यांपैकी महाराष्ट्रातील एका दाम्पत्याला हा बहुमान मिळणार आहे. नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याला हा मान देण्यात आला आहे,
अयोध्या, १९ जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्येसह देशभरात वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. तर कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा अयोध्येत ही भव्यता अनुभवायला मिळत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असलेल्या रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेला देशातील ११ दाम्पत्य पूजा करणार आहेत. या ११ दाम्पत्यांपैकी महाराष्ट्रातील एका दाम्पत्याला हा बहुमान मिळणार आहे. नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याला हा मान देण्यात आला असून अयोध्येत २२ जानेवारीला श्रीरामल्लांच्या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रभू श्रीरामांची पूजा हे जोडपं करणार आहे. तर विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी या पती-पत्नीची नावे आहेत. नवी मुंबईतील दाम्पत्याला अयोध्येतील श्रीराम पूजेचा मान मिळाल्यानंतर काय होती त्यांची भावना…बघा काय म्हणाले हे दाम्पत्य?