ठायी ठायी राम… अयोध्येत दुकानांवर रेखाटली राम चित्रे… अयोध्येत अवतरलं रामराज्य
अयोध्येतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या शटरवर विविध चित्र रेखाटल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदु संस्कृतीत ज्या चिन्हांना प्रामुख्यानं महत्त्व दिलं जातं अशी चिन्ह, चित्र व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या शटरवर रेखाटली आहे. रामपथावर असलेल्या दुकानांच्या शटरवर असलेल्या कलाकृतींमध्ये प्रामुख्याने गदा, श्री राम, स्वस्तिक, हनुमान, टीळा अशी चिन्ह पाहायला मिळत आहे
अयोध्या, ९ जानेवारी २०२४ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लांचं मंदिर सत्यात अवतरताना दिसणार आहे. त्याचपार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या नगरी रामाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. अयोध्येतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या शटरवर विविध चित्र रेखाटल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदु संस्कृतीत ज्या चिन्हांना प्रामुख्यानं महत्त्व दिलं जातं अशी चिन्ह, चित्र व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या शटरवर रेखाटली आहे. रामपथावर असलेल्या दुकानांच्या शटरवर असलेल्या कलाकृतींमध्ये प्रामुख्याने गदा, श्री राम, स्वस्तिक, हनुमान, टीळा अशी चिन्ह पाहायला मिळत आहे. यामुळे रात्री बाजार बंद झाल्यानंतर या परिसरात एक वेगळे दृश्य पहायला मिळत आहे. तर अयोध्या नगरीत रामराज्यात आल्याचा भास व्हावा या मागची व्यापाऱ्यांची संकल्पना असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
बिर्ला धर्मशाळा ते नया घाट हा भाग सध्या ‘जय श्री राम’, भगवान राम, राम दरबार यांच्या प्रतिमा असलेले भगवे ध्वज आणि आगामी राम मंदिराचे कलात्मक सादरीकरण असलेले फोटो आणि प्रतिमा येथील विक्रेते विकत आहेत. तसेच रामपथ आणि मंदिराच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवरील दुकानांवर त्यांची नावे आणि अयोध्या विकास प्राधिकरणाचा लोगो असलेले एकसारखे फलक लावण्यात आले आहेत.