परळीमध्ये धनंजय मुंडे विरूद्ध शरद पवार यांच्याकडून बबन गित्ते यांना उमेदवारी? पाहा स्पेशल रिपोर्ट
Tv9 special Report I शरद पवार यांच्याकडून बीड परळीत बबन गित्ते यांना उमेदवारीचे संकेत? धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवार यांनी उमेदवार शोधला? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | अजित पवार गटाविरोधात सभा घेण्याबरोबर उमेदवारांची निवड करणं देखील सुरू केल्याचे बघायला मिळत आहे. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात बबन गिते यांना शरद पवार यांच्याकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. १५ दिवसांआधी पक्षात आलेल्या बबन गित्ते यांना शरद पवार यांनी थेट उपाध्यक्ष केले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीमध्ये बबन गित्ते यांची लढाई होताना दिसणार आहे. तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवार यांनी आता रणनिती आखण्यास सुरूवात केल्याचे पाहायला मिळत आहे. बीडच्या सभेत बबन गित्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. तर शरद पवार यांनी बबन गित्ते यांना नियुक्तीचं पत्र देत त्यांना उपाध्यक्ष पद दिलं. त्यामुळे परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात शरद पवार यांच्याकडून बबन गित्ते यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिसताय.