Babanrao Lonikar यांची वीज अभियंत्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Mar 30, 2022 | 8:02 PM

तुमच्यावर income टॅक्स रेड करेल तुमची प्रॉपर्टीची कुंडली काढणार, ऊर्जा मंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना सांगून तुम्हाला निलंबित करेल, असे लोणीकर यांनी सुनावले आणि माझं मीटर जोडा अशी तंबीही दिलीय, ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. लोणीकरांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

औरंगाबाद : राज्यात वीजबिलाच्या मुद्द्यावरून (Electricity Bill) सध्या चांगल्याच ठिणग्या उडत आहेत. ज्यांची वीजबिलं थकली आहेत, त्यांची वीज तोडणी महावितरणाकडून सुरू आहे. अशातच आता मात्री मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या नावाने एक ऑडिओ क्लिप (Viral Audio Clip) सध्या व्हायरल होत आहे. ज्यात ते एका वीज अभियंत्याला शिवीगाळ करताना दिसून येत आहेत, त्या ऑडिओ क्लिपवर त्यांचं स्पष्टीकरणही आले आहे. औरंगाबादेत मध्ये भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा बांगला आहे. त्याचे साडेतीन लाख रुपये बिल पेंडिंग आहे. आता महावितरणने वीज कापली, त्यामुळं आमदार महोदय भडकले आणि थेट अभियंत्याला त्यांनी शिवीगाळ केली. चोरांना पकडत नाही आणि बिल भरणाऱ्याला त्रास देतात. माजले का तुम्ही या शब्दात त्यांनी अभियंत्याला सुनावले असल्याची ऑडिओ क्लिप समोर आली. तुमच्यावर income टॅक्स रेड करेल तुमची प्रॉपर्टीची कुंडली काढणार, ऊर्जा मंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना सांगून तुम्हाला निलंबित करेल, असे लोणीकर यांनी सुनावले आणि माझं मीटर जोडा अशी तंबीही दिलीय, ही ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. लोणीकरांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत.