‘जाणता राजा’ महानाट्य प्रेक्षकांना विनामूल्य, कुठे आणि किती तारखेपर्यंत पाहता येणार?
शिवतीर्थावर आजपासून रंगणार 'जाणता राजा' महानाट्याचा थाट, काय दिली आशिष शेलार यांनी माहिती
मुंबई : महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या जाणता राजा या महानाट्याचे सहा प्रयोग आजपासून मुंबईतील दादर येथील शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजीपार्क येथे रंगणार आहेत. आज १४ मार्चपासून ते रविवारी १९ मार्च यादरम्यान संध्याकाळी पावणे सात वाजता शिवप्रेमींसह प्रेक्षकांना पाहता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित जाणता राजा महानाट्याचे प्रयोग शिवाजी पार्कवर भव्य आणि आकर्षक मंचावर होणार आहे. याकरता पाच मजली फिरता रंगमंच असणार आहे. या महानाट्याबाबत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी माहिती दिली आहे. आशिष शेलार म्हणाले १९ मार्चपर्यंत प्रेक्षकांना जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग विनामुल्य पाहता येणार आहे.
Published on: Mar 14, 2023 10:50 PM
Latest Videos