'झुकेगा नही साला...', अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झळकले पोस्टर, बच्चू कडू यांचा आज एल्गार!

‘झुकेगा नही साला…’, अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झळकले पोस्टर, बच्चू कडू यांचा आज एल्गार!

| Updated on: Aug 09, 2023 | 8:35 AM

VIDEO | अमरावतीमध्ये आज एल्गार मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झळकले पोस्टर, कुणासाठी बच्चू कडू पुन्हा एकदा उतरणार मैदानात?

अमरावती, ९ ऑगस्ट २०२३ | प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज अमरावतीत जन एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहेत. अमरावतीनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांच्या या मोर्चात एकूण 10 मागण्या करण्यात येणार आहे. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून बच्चू कडू यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं आहे. तर याकरता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झळकले बच्चू कडू यांचे पोस्टर झळकले आहेत. यावर ‘नाही परवा सत्तेची कारण चिंता आहे शेतकऱ्यांची…झुंकेगा नही साला’, असे म्हटले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रहार संघटना मोर्चा काढून आपला निषेध नोंदवणार आहे. आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या पाहिजे. बळीराजाला दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

Published on: Aug 09, 2023 08:35 AM