Bachchu Kadu Video : ‘…तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहात का? ‘, बच्चू कडू यांच्याकडून सरकारला औरंगजेबाची उपमा?
बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. औरंगजेबानेच्या काळात जेवढे लोक मारले नसतील, त्यापेक्षा अधिक लाखो शेतकऱ्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्यात असं बच्चू कडू म्हणाले.
‘राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारच्या धोरणामुळे झाल्यात’, असं वक्तव्य प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू यांनी केलंय. तुमच्या धोरणामुळे जर लोकं मरत असतील तर तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहात का? असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी थेट सरकारला झापल्याचे पाहायला मिळाले. बच्चू कडू म्हणाले, ‘औरंगजेबाची कबर राज्यात हवी की नको या वादापेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मुद्दा महत्त्वाच्या आहे. जेवढे औरंगजेबाने कापले नाहीतर तेवढे तुमच्या धोरणाने कापलेत’. तर साडे तीन लाख शेतकरी मेला… यामध्ये तरूण आणि शेतकऱ्यांमध्ये वर्षाला किमान साठ हजार जणांनी आत्महत्या करतात. ज्यांना सरकराच्या धोरणामुळे जगणं कठीण होतंय. जर तुमच्या धोरणामुळे लोक मरत असतील तर तुम्ही औरंगजेबापैक्षा कमी आहात का? असा सवाल बच्चू कडू यांना विचारला आहे. इतकंच नाहीतर सरकारने धर्म, जात यावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला देखील बच्चू कडूंनी यावेळी दिला.