Mumbai Student Protest | ‘उद्धव काका तुमचा मुलगा मंत्री’, मुंबईतील वांद्रेत विद्यार्थ्यांचं आंदोलन
वांद्रे इस्टमधील न्यू इंग्लिश स्कुलसमोर विद्यार्थी आणि पालक हे आंदोलन करत आहेत. ऑनलाईन शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्यात आलं आहे. राज्य सरकारने कोरोना काळात शाळांनी फीची सक्ती करु नये हे सांगितल असताना शाळेची मनमानी सुरुये. याविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी एल्गार पुकारला आहे.
वांद्रे इस्टमधील न्यू इंग्लिश स्कुलसमोर विद्यार्थी आणि पालक हे आंदोलन करत आहेत. ऑनलाईन शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्यात आलं आहे. राज्य सरकारने कोरोना काळात शाळांनी फीची सक्ती करु नये हे सांगितल असताना शाळेची मनमानी सुरुये. याविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी एल्गार पुकारला आहे. यावेळी “उद्धव काका तुमचा मुलगा मंत्री, पण आमच्या शिक्षणाच काय”, अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्यात. यामुळे 400 विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलं आहे. या आंदोलनाला मनसेने सुद्धा पाठिंबा दिला आहे. शाळेकडे पैसे असूनही विद्यार्थ्यांना वेठीस धरलं जात आहे, असा आरोप पालकांनी केला आहे. यासाठी भीक मागो आंदोलन केलं जात आहे, असंही त्यांनी सांगितलं. | bandra new english school students did protest
Latest Videos