'भाग्य लिहिताना देवाने मला संघर्ष...', पराभवानंतर पंकजा मुंडेंची पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना भावनिक साद

‘भाग्य लिहिताना देवाने मला संघर्ष…’, पराभवानंतर पंकजा मुंडेंची पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना भावनिक साद

| Updated on: Jun 18, 2024 | 2:16 PM

सोमवारी येस्तार येथे पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्या प्रचंड हळव्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. आज पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्यातल्या येस्तार या गावातील गावकऱ्यांशी बोलत होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या, दुर्दैव आहे... नेमकं काय म्हणाल्या, बघा व्हिडीओ

लातूर येथील अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील सचिन कोंडिबा मुंडे याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यास सचिन गेला असा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. दरम्यान नुकताच त्याचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी दिल्लीतून सचिनच्या कुटुंबियांना धीर दिला होता. तर सोमवारी येस्तार येथे पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी त्या प्रचंड हळव्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. आज पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्यातल्या येस्तार या गावातील गावकऱ्यांशी बोलत होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या, दुर्दैव आहे… राजकारण बदलत चालले आहे. संविधानकर्त्यालाही निवडणूक लढताना पराभवाला सामोरे जावे लागले. माझं जीवन कठीण वर्गात लिहलेले आहे, भाग्य लिहिताना देवाने मला संघर्ष करणाऱ्या वर्गात टाकलं आहे. कायम सत्तेत असणाऱ्या वर्गात नाही टाकलेल, त्यामुळे पराभव हा मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे, असं पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे.

Published on: Jun 18, 2024 02:16 PM