‘या’ गावची अनोखी प्रथा, धुलिवंदनला जावयाची गाढवावरून जंगी मिरवणूक, बघा व्हिडीओ
VIDEO | होळीनिमित्त जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा, कुठं आहे ही प्रथा
बीड : जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात आहे. रंगपंचमी निमित्त जावई शोधून आणतात. यंदा हा मान केज तालुक्यातील जवळबन येथील जावयाला मिळाला आहे. मागच्या 91 वर्षांपासून रंगपंचमीला एका जावयाची गाढवावरून मिरवणूक निघते. यंदा अविनाश करपे या मिरवणुकीचे मानकरी ठरले आहेत. करपे यांना तरुणांनी सोमवारी ताब्यात घेतले होते. आज त्यांना गाढवावर बसवून त्यांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. थट्टा मस्करीत सुरू झालेली ही प्रथा आता या गावची संस्कृती बनली आहे. तशी या गावात घरं आणि जावयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे याच विडा गावात ही अनोखी परंपरा दरवर्षी साजरी केली जाते.
Published on: Mar 07, 2023 03:54 PM
Latest Videos