BEST Strike | बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठी बातमी, मुख्यमंत्री संध्याकाळी काय करणार घोषणा?

BEST Strike | बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मोठी बातमी, मुख्यमंत्री संध्याकाळी काय करणार घोषणा?

| Updated on: Aug 08, 2023 | 1:34 PM

VIDEO | मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य कामगार सेनेची मोठी घोषणा

मुंबई, ८ ऑगस्ट २०२० | मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप आज अखेर मागे घेण्यात आला आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी हा संप पुकारला होता. मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली होती. त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य कामगार सेनेने बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाबाबत आज, मंगळवारी संध्याकाळी मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा गेल्या सात दिवसांपासून सुरू असेलला संप मागे घेतल्यानं आजपासून हे सर्व कर्मचारी कामावर रुजू होतील. त्यामुळे मुंबईकरांना हा मोठा दिलासा असणार आहे.

Published on: Aug 08, 2023 01:34 PM