नाशिकमधील भाम धरण 100 टक्के भरलं

| Updated on: Jul 17, 2022 | 1:43 PM

नाशिकमधील भाम धरण 100 टक्के भरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे नाशिकमधील भाम धरण शंभर टक्के भरलं आहे.

नाशिकमधील भाम धरण 100 टक्के भरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे नाशिकमधील भाम धरण शंभर टक्के भरलं आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी खळखळून वाहू लागलं आहे. शनिवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर बराचसा कमी होऊन काही ठिकाणी आठवडाभरानंतर प्रथमच सूर्यदर्शनही झालं. संततधारेत जुने नाशिक भागात जुन्या वाड्यांची पडझड सुरू आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने काही धरणांमधील विसर्ग कमी करण्यात आला आहे.

Published on: Jul 17, 2022 01:43 PM
पी.व्ही. सिंधूचा नवा विक्रम, सिंगापूर ओपन स्पर्धेत सिंधूची उल्लेखनीय कामगिरी
कर्नाटकातील गोकाक धबधबा प्रवाहित, धबधब्यावर पर्यटकांची गर्दी