दिवाळी पाडव्यानंतर पवार कुटुंबाची भाऊबीजही वेगळी, गोविंदबागेत अजितदादांच्या कुटुंबाची गैरहजेरी अन्…

यंदा पहिल्यांदाच पवार कुटुंबात दोन पाडवे झालेत. त्यानंतर भाऊबीज देखील शरद पवार कुटुंब आणि अजित पवार कुटुंबाने वेगवेगळी भाऊबीज साजरी केली. दरम्यान, इतर राजकीय नेत्यांनी देखील वेगवेगळी भाऊबीज साजरी केली.

दिवाळी पाडव्यानंतर पवार कुटुंबाची भाऊबीजही वेगळी, गोविंदबागेत अजितदादांच्या कुटुंबाची गैरहजेरी अन्...
| Updated on: Nov 04, 2024 | 10:29 AM

राष्ट्रवादी पक्षफुटीचा परिणाम पवार कुटुंबातील नात्यांवर देखील झालाय. बारामतीमध्ये पहिल्यांदाच दोन वेगळे पाडवे साजरे झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पवार कुटुंबातील भाऊबीजेकडे देखील सर्वांचं लक्ष होतं. मात्र गोविंद बागेत सुप्रिया सुळेंनी संपुर्ण कुटुंबासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी अजित पवारांचं कुटुंब सोडून सर्व पवार कुटुंब गोविंदबागेत एकत्रित येत भाऊबीज साजरी केली. बारामतीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी देखील भाऊबीज साजरी केली. बारामतीत त्यांनी त्यांच्या घरी बहिणींसह भाऊबीज साजरी केली. यावेळी युगेंद्र पवार यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी देखील भाऊबीज साजरी केली. पुण्यातील शेवाळेवाडी निवासस्थानी येथे रूपाली चाकणकर यांनी भाऊबीज साजरी केली. तर भाजपचे आशिष शेलार यांनी आशा भोसले यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. आशा भोसलेंनी आपल्या निवासस्थानी आशिष शेलारांचं औक्षण केलं. तर दुसरीकडे प्रसाद लाड यांनी चित्रा वाघ यांच्याकडून औक्षण करून घेतलं आणि भाऊबीज साजरी केली. यावेळी या दोघांनी महायुतीचं सरकार येऊदे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊदे अशी भावना व्यक्त केली. बघा आणखी कोणाची कशी झाली भाऊबीज?

Follow us
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा.
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा.
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?.
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?.