म्हणून मी पण रांगेत उभं राहिलो, राज्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी केलं मतदान
भिवंडीतील दिव्या गावात कपिल पाटील यांनी केलं मतदान... देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असताना नागरिक सुद्धा त्यांच्या या विकासाच्या कार्याला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदान करून मला पुन्हा एकदा हॅट्रिक करण्याची संधी देतील, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. भिवंडीतील दिव्या गावात विद्यमान खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांसह रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला . देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असताना नागरिक सुद्धा त्यांच्या या विकासाच्या कार्याला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदान करून मला पुन्हा एकदा हॅट्रिक करण्याची संधी देतील, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली आहे. जसं नरेंद्र मोदी यांच्यासाठी संपूर्ण देश हा त्यांचा परिवार आहे. तसेच माझं गाव हा माझ्यासाठी परिवार असल्याने माझ्या गावातील नागरिकांना मागे करून मला मतादान करण्यासाठी पुढे जायचं नव्हतं आणि म्हणूनच मी रांगेत सर्वसामान्य नागरिकां सारखा रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावलेला आहे. नागरिकांनी सुध्दा मोठ्या संख्येने मतदानासाठी उन्हाची परवा न करता बाहेर पडावं, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले आहे.