भिवंडीत भाजपचं ‘कमळ’ फुलणार की शरद पवारांची ‘तुतारी’ वाजणार?
राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा हे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधताना दिसताय. तर भिवंडीत कमळ फुलणार की यंदा तुतारी वाजणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा यांनी भाजपच्या कपिल पाटलांवर निशाणा साधलाय.
ठाणे जिल्ह्यातील रंगतदार राजकारणात आता भिवंडी लोकसभेची चर्चाही जोरदार सुरू आहेत. ही लढत तिरंगी होण्याची शक्यता असून आरोप प्रत्यारोपात आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आमनेसामने आले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा हे भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधताना दिसताय. तर भिवंडीत कमळ फुलणार की यंदा तुतारी वाजणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्या मामा यांनी भाजपच्या कपिल पाटलांवर निशाणा साधलाय. 2014, 2019 च्या निवडणुकीत पाटील कोणता मोहल्ला, बिल्डिंगमध्ये गेलेले दिसले का? आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात. याचे श्रेय सर्व मतदारांचे आहे. ज्यांनी कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली आणि तिसऱ्यावेळी रस्त्यावर आणले आहे.’ तर माझ्या विरोधात लढण्यासाठी 17 पक्ष फिरले पण 17 वेळा उमेदवारी नाही मिळाली. कुठेतरी माणूस स्थिर बसला पाहिजे. नशीब निष्ठा वैगरे अजून काही तर बोलले नाही. कपिल पाटील यांनीही बाळ्या मामांवर टोमणा मारत चिमटा काढलाय.