'उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे आदळ-आपट आणि थयथयाट', अशिष शेलार यांचा हल्लाबोल

‘उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे आदळ-आपट आणि थयथयाट’, अशिष शेलार यांचा हल्लाबोल

| Updated on: Jan 24, 2023 | 12:01 PM

उद्धव ठाकरे यांनी शेठजी असल्याप्रमाणे वसुली केली, मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला; काय केले आशिष शेलारांनी आरोप?

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त केलेल्या भाषणावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे केवळ आदळ-आपट, थयथयाट आणि नृत्य असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे.

उद्धव ठाकरे यांनी एवढी वर्ष शेठजी असल्याप्रमाणे वसुली केली, मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला असा गंभीर आरोप भाजपाकडून करण्यात आला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी याबाबत आरोप करताना असे म्हटले की, मुंबई महापालिकेवर दरोडा टाकण्याचे काम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचे आहे. या डाकूंपासून मुंबईकरांना मुक्त करणं हे भाजपचं मिशन आहे. भाजपने पारदर्शी पद्धतीने चौकीदारी केली म्हणून मुंबई महापालिकेच्या ठेवी या सुरक्षित आहे. या ठेवींचा उपयोग मुंबईकरांना होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 24, 2023 11:48 AM