चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना काय दिला होळीच्या दिवशी सल्ला?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना काय दिला होळीच्या दिवशी सल्ला?

| Updated on: Mar 07, 2023 | 3:09 PM

VIDEO | चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्याकडून व्यक्त केली अपेक्षा, काय म्हणाले बघा व्हिडीओ

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात होळी साजरी केली. आजचा दिवस हा मनभेद आणि मतभेद बाजूला करून एकत्रितपणे काम करण्याचा दिवस आहे, आजच्या दिवशी महाराष्ट्रात सुद्धा सर्वच पक्षांनी सर्वच नेत्यांनी सर्व स्तरावरचे मनभेद दूर करून महाराष्ट्र देशात क्रमांक एक करण्याकरिता सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तर यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाला खोचक सल्लाही दिल्याचे पाहायला मिळाले. मी विरोधकांना विनंती करेल की, आजपासून आपले मनभेद आणि मतभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे कसा जाईल, यासाठी प्रयत्न करावे. संजय राऊतांकडून अपेक्षा करेल की त्यांनी उद्यापासून मनभेद आणि मतभेद विसरून जावे, असेही ते म्हणाले.

Published on: Mar 07, 2023 03:09 PM